Wednesday, February 05, 2025 12:16:54 PM

Uddhav Thackeray
भाजपाच्या हिंदुत्वावर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनामिमित्त आयोजित कार्यक्रमात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर एकेरी भाषेत टिका केली आहे.

भाजपाच्या हिंदुत्वावर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनामिमित्त आयोजित कार्यक्रमात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर एकेरी भाषेत टिका केली आहे. भाजपाच्या हिंदुत्वाच्या मुद्यावर ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. 1992-93 च्या दंगलीनंतर आडवाणींनी माफी का मागितली असा थेट सवाल त्यांनी भाजपाला केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच जाहीर सभेत भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी जनसंघावरही टिका करत भाजपाला पुरतं डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

उद्धव यांच्या टिकेवर भाजपाकडून सडकून प्रत्युत्तर दिलं आहे.  भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पोस्टद्वारे उद् यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

हेही वाचा : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु होणार मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष

आशिष शेलार यांची पोस्ट

श्रीमान उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० चा आहे
त्यामुळे 1951 ला स्थापन झालेल्या जन संघाविषयी त्यांना काय माहित असणार?
1980 ला जन संघांच्या बैठकीत राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय झाला
त्यावेळी उद्धव यांचे वय 20 वर्षे होते त्यामुळे याबाबत त्यांना कशी माहिती असणार
करगोट्यातून इज्जत निसटण्याच्या वयात असतानाचे संदर्भ देत तुम्ही कशाला बोलता?
जनसंघ आणि भाजपाच्या स्थापनेवर का बोलता?
100 वर्षे पूर्ण करणाऱ्या संघावर बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार ?
कंत्राटदारांकडून कटकमिशन खाऊन मुंबईचा जो बट्ट्याबोळ केलात 
त्याचे व्रण दोन कोटी मुंबईकरांच्या काळजावर आहेत
कधीतरी मातोश्रीच्या आरशा समोर उभे राहून विचारुन पहा 
मग कळेल जखमा खोल आहेत की तुमच्या मेंदूतच झोल आहेत

भाजपाकडून वारंवार होणाऱ्या टिकेमुळे ठाकरे यांनी अमित शाह यांना टार्गेट केलं आहे. गेल्या काही दिवसात त्यांच्याकडून सातत्याने शाह यांच्यावर टिका होतेय. 'मोदी तुझसे बैर नही, अमित शाह तेरी खैर नही' असा काहिसा पवित्रा ठाकरे गटाने घेतला नाही ना? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.   
 


सम्बन्धित सामग्री