Wednesday, September 18, 2024 07:45:40 AM

Test Cricket
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आठव्यांदा घडली एक दुर्मिळ घटना

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना रद्द करण्यात आला. एकही चेंडू टाकण्यात आला नाही, यामुळे हा सामना रद्द करण्यात आला.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आठव्यांदा घडली एक दुर्मिळ घटना

नोएडा : अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना रद्द करण्यात आला. एकही चेंडू टाकण्यात आला नाही, यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. मुसळधार पाऊस आणि ओले मैदान यामुळे खेळ झाला नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात चेंडू टाकल्याशिवाय कसोटी सामना रद्द होण्याची ही आठवी वेळ आहे. एकविसाव्या शतकात असे पहिल्यांदाच घडले आहे. कसोटी क्रिकेटच्या ९१ वर्षांच्या इतिहासात एकही चेंडू टाकल्याशिवाय कसोटी रद्द होण्याची ही आशियातील पहिली वेळ आहे. याआधी रद्द झालेले सात कसोटी सामने आशिया खंडाबाहेर होते. 

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात २५४९ कसोटींपैकी आठ सामने एकही चेंडू टाकल्याशिवाय रद्द करण्यात आले आहेत. न्यूझीलंड संघाची १९९८ मध्ये भारताविरुद्धची ड्युनेडिन कसोटीही पावसामुळे रद्द झाली होती.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील रद्द झालेले आठ सामने

  1. अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड - २०२४
  2. भारत विरुद्ध न्यूझीलंड - १९९८
  3. पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे - १९९८
  4. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज - १९९०
  5. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान - १९८९
  6. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (तीन अॅशेस कसोटी सामने) - १८९०, १९३८ आणि १९७०
     

सम्बन्धित सामग्री