Thursday, March 20, 2025 09:07:32 AM

मुंबईत विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाची मिरवणूक

वीस - वीस षटकांचा क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाची मिरवणूक मुंबईतून काढली जाणार आहे.

मुंबईत विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाची मिरवणूक

मुंबई : वीस - वीस षटकांचा क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाची मिरवणूक मुंबईतून काढली जाणार आहे. भारतीय क्रिकेटची पंढरी अशी मुंबईची ओळख आहे. याच कारणामुळे विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाची मुंबईत मिरवणूक काढण्याचा निर्णय झाला आहे. मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम असा मिरवणुकीचा मार्ग आहे. संध्याकाळी पाच वाजता ही मिरवणूक सुरू होणार आहे. 

बीसीसीआयने जाहीर केला पुरस्कार

भारतीय क्रिकेटपटूंना बीसीसीआयने १२५ कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराचे वितरण वानखेडे स्टेडियम येथे केले जाणार आहे.

असा आहे भारतीय क्रिकेट संघाचा गुरुवारचा कार्यक्रम

  1. सकाळी ६ वाजता दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन
  2. सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान पंतप्रधान मोदींसोबत भेटीचा कार्यक्रम
  3. दुपारी २ वाजता मुंबईसाठी विमानाने रवाना होणार
  4. संध्याकाळी ५ वाजता मरिन ड्राईव्ह येथून मिरवणूक
  5. संध्याकाळी ७ वाजता मिरवणुकीचा वानखेडे येथे समारोप आणि वानखेडे स्टेडियम येथे विशेष सोहळा

सम्बन्धित सामग्री