Wednesday, October 30, 2024 05:02:16 PM

Political Crime
'राजकीय गुन्ह्यांवर कारवाई करा'

महाराष्ट्रातील राजकीय गुन्ह्यांबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी चिंता व्यक्त केली.

राजकीय गुन्ह्यांवर कारवाई करा

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय गुन्ह्यांबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी चिंता व्यक्त केली. निवडणुकीचे वातावरण बिघडवण्याच्या हेतूने राजकीय गुन्हे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यासंदर्भातील आदेश राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड मधील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत राजीव कुमार यांनी निवडणूक काळातील राजकीय गुन्ह्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo