Friday, June 28, 2024 09:03:10 PM

Suryakanta Patil
माजी मंत्री सूर्यकांता पाटील राशपात प्रवेश करणार

सूर्यकांता पाटील मंगळवार २५ जून रोजी राशपमध्ये प्रवेश करणार आहेत.

माजी मंत्री सूर्यकांता पाटील राशपात प्रवेश करणार

हदगाव : भारतीय जनता पक्षात दहा वर्ष कार्यरत असलेल्या माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पक्ष सदस्यत्वाचा आणि हदगाव विधानसभा संयोजक या पदाचा राजीनामा दिला. सूर्यकांता पाटील मंगळवार २५ जून रोजी राशपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार आहे. भाजपात प्रवेश करण्याआधी सूर्यकांता पाटील शरद पवार यांच्यासोबत काम करत होत्या. पण पवार समर्थकांशी वाद झाल्यानंतर भाजपात गेलेल्या सूर्यकांता पाटील आता दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा शरद पवारांसोबत काम करणार आहेत.


सम्बन्धित सामग्री