Thursday, November 21, 2024 03:51:47 PM

Jaggi Vasudev
जग्गी वासुदेव यांना दिलासा

सर्वोच्च न्यायालयाने ईशा फाउंडेशन आणि जग्गी वासुदेव यांना निर्दोष ठरवून त्यांच्या विरोधातील कारवाई थांबवली आहे.

जग्गी वासुदेव यांना दिलासा

नवी दिल्ली : ईशा फाउंडेशनचे संस्थापक तसेच सद्गुरु आणि साधुगुरु या नावांनी ओळखले जाणारे जग्गी वासुदेव यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. संस्थेच्या आश्रमात दोन मुलींना कोंडले असल्याचा आरोप होत होता. पण या आरोपात तथ्य नाही; असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला. आश्रमात येणाऱ्या महिला त्यांच्या मर्जीने ये - जा करत असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. हा अहवाल मिळाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने जग्गी वासुदेव यांना दिलासा दिला. 

ज्यांना कोंडून ठेवल्याचा आरोप होत आहे त्या दोघी सज्ञान आहेत. स्वच्छेने आश्रमात आल्या आहेत. पोलिसांचा आश्रमात ये - जा करणाऱ्या महिलांबाबतचा अहवालही आला आहे. या सर्व बाबींची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने जग्गी वासुदेव यांना दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ईशा फाउंडेशन आणि जग्गी वासुदेव यांना निर्दोष ठरवून त्यांच्या विरोधातील कारवाई थांबवली आहे. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo