मुंबई : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अनेक महिन्यांपासून अडकलेले अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस एजन्सीने SpaceX Crew-9 मिशन यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहे. स्पेस एक्सने फ्लोरिडामधून कॅप कॅनारवेलमधून उड्डाण घेतले आहे. यात अंतराळ प्रवासी निक हेग आणि अॅलेक्झांडर गोरबुनेव यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणार आहे. यातील दोन जागा रिक्त असून परतीच्या प्रवासात त्या सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोन्ही अंतराळवीर परतण्याची शक्यता आहे. नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी ट्विटरवर या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल नासा आणि स्पेस एक्सचे अभिनंदन केले आहे.