मुंबई : जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि सत्ताधारी महायुतीतील सदस्य सुनील तटकरे यांची विशेष मुलाखत संपादक आशुतोष पाटील यांनी घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर होणारे आरोप चुकीचे असल्याचे मुलाखतीत स्पष्ट केले. तटकरे म्हणाले की, "फडणवीसांनी कधीही फोडाफोडी केली नाही." तसेच, भाजपासोबत जाण्याची तयारी २००९ पासूनच होती, अशी माहिती त्यांनी दिली.
तटकरे यांनी सांगितले की, "सर्व ५३ आमदारांच्या सह्यांचे पत्र शरद पवारांकडे पाठवले." त्यांनी भाजपासोबत वाटाघाटींसाठी तिघांची समिती नेमली असल्याचेही मुलाखतीत जाहीर केले.
अजित पवारांवर होणाऱ्या आरोपांवर तटकरे म्हणाले, "अजित पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे." महायुतीतून कोणत्याही जागेवरून तुटणं शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
तटकरे यांनी महायुतीच्या कामकाजावर देखील भाष्य केले. "फडणवीसांनी मराठा आंदोलन जबाबदारीने हाताळले आणि महायुतीच्या काळात विकासकामांना वेग मिळाला." तसेच 'महायुतीतचे सरकार बहुमताने पुन्हा येईल' असा विश्वास जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या विशेष मुलाखतीत सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.