Saturday, March 29, 2025 10:08:28 AM

बजावला मतदानाचा हक्क

ज्येष्ठ कलाकार सुबोध भावे यांनी पुण्यात मतदान केले आहे.

बजावला मतदानाचा हक्क
subodh bhave voting

पुणे, १३ मे २०२४, प्रतिनिधी : ज्येष्ठ कलाकार सुबोध भावे यांनी पुण्यात मतदान केले आहे. सामान्य नागरिक, कलाकार, ज्येष्ठ नागरिक या लोकशाहीच्या उत्सवात सामील होत आहेत. ज्येष्ठ कलाकार सुबोध भावे यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुका पार पडत आहेत. 'मला लोकशाही ने जो हक्क दिलं आहे, त्या एका मताची किंमत खूपच जास्त आहे आणि म्हणूनच मी मुंबईतून प्रवास करून पुण्याला येत असतो आणि मतदान करून परत कामासाठी मुंबईत परततो.' हा लोकशाहीचा उत्सव असून आपण आपला मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे', असेही सुबोध भावे यावेळी म्हणाले.
सोमवारी, १३ मे रोजी महाराष्ट्रासह देशभरातील एकूण ९६ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगांव, रावेर, शिर्डी, अहमदनगर दक्षिण, पुणे, शिरूर, मावळ, बीड , जालना, छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे.


सम्बन्धित सामग्री