Wednesday, September 18, 2024 02:19:05 AM

Manipur
मणिपुरात विद्यार्थ्यांच्या मोर्चाला हिंसक वळण

मणिपूरमध्ये कुकींनी हिंदू मैतेई समाजाच्या नागरी वस्तीवर रॉकेटद्वारे हल्ला केला. या घटनेचा निषेध करण्यासाठी राजधानी इंफाळ येथे विद्यार्थ्यांनी राजभवनावर मोर्चा काढला होता. यावेळी हिंसा झाली.

मणिपुरात विद्यार्थ्यांच्या मोर्चाला हिंसक वळण

इंफाळ : मणिपूरमध्ये कुकींनी हिंदू मैतेई समाजाच्या नागरी वस्तीवर रॉकेटद्वारे हल्ला केला. या घटनेचा निषेध करण्यासाठी राजधानी इंफाळ येथे विद्यार्थ्यांनी राजभवनावर मोर्चा काढला होता. यावेळी हिंसा झाली. हिंसेत चाळीस विद्यार्थी जखमी झाले. हिंसाचार झाल्यामुळे तीन जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याआधी कायदा - सुव्यवस्था मणिपूर सरकारने इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, थौबल, बिष्णुपूर आणि कक्चिंग जिल्ह्यांच्या प्रादेशिक अधिकारक्षेत्रात लीज लाइन्स, व्हीएसएटी, ब्रॉडबँड आणि व्हीपीएन सेवांसह इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा पाच दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला.

विद्यार्थ्यांच्या मोर्चावर मणिपूरमध्ये पोलिसांनी लाठीमार केला. अश्रुधुराचा मारा केला. कंगपोकी जिल्ह्यात दोन सशस्त्र गटांमधील गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने तणावात भर पडली आहे. थंगबु या दुर्गम खेड्यात जमावाने काही घरे जाळल्याने ग्रामस्थांनी गावाबाहेर पळ काढावा लागला आहे. 


सम्बन्धित सामग्री