जळगाव, १३ मे २०२४, प्रतिनिधी : जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील निवडणुका पार पडत आहेत.
अमळनेर तालुक्यातील डांगर या गावातील मतदान केंद्रावर सोमवारी सकाळी सात स्मिता वाघ यांनी मतदान केले आहे. गावातील पहिले मतदान स्मिता गावित यांनी केले. 'लोकशाहीच्या उत्सवात प्रत्येक मतदाराने सहभागी व्हावे आणि मोठ्या संख्येने मतदान करावे', असे आवाहन यावेळी स्मिता वाघ यांनी केले आहे. यावेळी त्यांची कन्या भैरवी वाघ पलांडे आणि ईशा वाघ यांनी देखील त्यांच्या आईसह मतदानाचा हक्क बजावला. मतदान करण्यापूर्वी स्मिता गावित यांनी गावातील ग्राम दैवत मरिमातेच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला. सोमवारी, १३ मे रोजी महाराष्ट्रासह देशभरातील एकूण ९६ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगांव, रावेर, शिर्डी, अहमदनगर दक्षिण, पुणे, शिरूर, मावळ, बीड , जालना, छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे.