Thursday, July 04, 2024 09:22:40 AM

Women in Modi Cabinet
मोदी मंत्रिमंडळात नारी शक्ती

मोदींच्या मंत्रिमंडळात सहा महिलांचा मंत्री म्हणून समावेश होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

मोदी मंत्रिमंडळात नारी शक्ती

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी रविवार ९ जून २०२४ रोजी संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात सहा महिलांचा मंत्री म्हणून समावेश होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. निर्मला सीतारमण, अनुप्रिया पटेल, शोभा करदंजले, अन्नपूर्णा देवी, रक्षा खडसे, निमुबेन बम्भानिया यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे समजते. निर्मला सीतारमण यांना पुन्हा एकदा केंद्रीय अर्थमंत्री म्हणून जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. मनमोहन सिंह यांच्यानंतर निर्मला सीतारमण या देशातल्या दुसऱ्या अर्थमंत्री आहेत ज्यांनी अर्थमंत्री म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. मोदी सरकारच्या आधीच्या कार्यकाळात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री असलेल्या अनुप्रिया पटेल यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचे समजते. बंगळुरू उत्तरच्या खासदार शोभा करंदलाजे यांना पुन्हा एकदा मोदी मंत्रिमंडळात मंत्री होण्याची संधी मिळणार असल्याचे वृत्त आहे. अन्नपूर्णा देवी झारखंडमधील कोडरमा येथून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्या यंदाच्या मोदी मंत्रिमंडळात मंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी हाताळणार असल्याचे वृत्त आहे. रक्षा खडसे या महाराष्ट्रातील रावेरमधून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत, त्यांचाही मंत्रिपदासाठी वरिष्ठ नेते विचार करत आहेत. गुजरातच्या भावनगरमधून निवडून आलेल्या निमुबेन बम्भानिया यांचाही मंत्रिपदासाठी विचार सुरू असल्याचे वृत्त आहे.

 

  1. मोदी मंत्रिमंडळात नारी शक्ती
  2. मंत्रिमंडळात सहा महिलांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, सूत्रांची माहिती
  3. निर्मला सीतारमण, अनुप्रिया पटेल, शोभा शोभा करंदलाजे, अन्नपूर्णा देवी, रक्षा खडसे, निमुबेन बम्भानिया यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता

सम्बन्धित सामग्री