मुंबई : जे. जे. रुग्णालयातील सहा वॉर्डमध्ये मध्यवर्ती वातानुकूलन यंत्रणा बसविण्यात आली असून, येत्या दोन दिवसांत त्याचे उद्घाटन होणार आहे. राज्यभरातील रुग्ण जे. जे. मध्ये उपचारासाठी येतात.
अनेकदा खासगी रुग्णालयांतील खर्च परवडत नाही म्हणून अनेक रुग्ण जे. जे.मध्ये दाखल होतात. त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी रुग्णालयातील सहा वॉर्ड अत्याधुनिक करण्यात आले आहेत. या वॉर्डाचा खर्च मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई जिल्हा नियोजन विकास समिती आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या निधीतून केला आहे. यापूर्वी जे. जे. रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २१ हृदय शस्त्रक्रियेसाठीच्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज करण्यात आला होता. या नर्सिंग होम, वॉर्डचे उदघाटन हे दोन ते तीन दिवसांत केले जाणार आहे.