Tuesday, September 17, 2024 01:57:52 AM

Sion Railway Flyover
शीव रेल्वे उड्डाणपूल १ ऑगस्टपासून बंद

शीव रेल्वे उड्डाणपूल वाहनांसाठी ३१ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजल्यानंतर बंद होणार आहे.

शीव रेल्वे उड्डाणपूल १ ऑगस्टपासून बंद

मुंबई : शीव रेल्वे उड्डाणपूल वाहनांसाठी ३१ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजल्यानंतर बंद होणार आहे. वाहतूक पोलिसांच्या आदेशानुसार ही कारवाई होत आहे. यामुळे १ ऑगस्टपासून मुंबईकरांना पर्यायी मार्गावरुन प्रवास करावा लागेल. पूर्व द्रुतगती मार्ग आणि धारावी, ९० फुटी रोड यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग म्हणजे शीव रेल्वे उड्डाणपूल. पुलावरून दोन्ही दिशांनी मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. पण हा पूल धोकादायक स्थितीत असल्याने त्याच्या पुनर्बांधणीसाठी वाहतूक पोलिसांनी तो बंद करण्याचा आदेश काढला आहे. शीव रेल्वे उड्डाणपूल बंद झाल्यानंतर सांताक्रुझ-चेंबूर जोड रस्ता आणि पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा लाल बहादूर शास्त्री मार्ग तसेच धारावीकडे जाणारा मार्ग असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. शीव रुग्णालयाच्या ५०० मीटर परिसरात असलेला धारावी धोबीघाट आणि शीव स्थानकाच्या ३५० मीटर अंतरावर कुर्ला दिशेचा पादचारी पूल असे पर्याय पादचाऱ्यांसाठी आहेत. पूल पाडणे आणि नव्याने बांधणे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागेल, असा प्राथमिक अंदाज आहे. मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिका संयुक्तपणे नव्या पुलाची उभारणी करणार आहे. 


सम्बन्धित सामग्री