Saturday, September 21, 2024 08:59:12 PM

Tirupati Balaji
तिरुपती प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी

तिरुपती प्रकरणी सीबीआय चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी केली

तिरुपती प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी उघड केले. या प्रकरणी सीबीआय चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी केली आहे. तिरुपती प्रकरणात हिंदूंच्या श्रद्धास्थानावर हल्ला झाला आहे. यामुळे प्राण्यांच्या चरबीपासून तयार केलेला स्निग्ध पदार्थ लाडूसाठी कोण बनवत होते ? या कामासाठी कंत्राट कोणी काढले आणि कोणाला दिले ? या सर्व बाबी तपासणे आवश्यक आहे. किती प्रमाणात पुरवठा झाला आणि त्याच्या वापराचे तपशील शोधून काढून जाहीर केले पाहिजेत, अशीही मागणी त्यांनी केली. ज्यांनी लाडवात प्राण्यांच्या चरबीचा वापर केला त्यांना काळ्या यादीत टाकणे आवश्यक आहे; अशी मागणी शोभा करंदलाजे यांनी केली. 
 


सम्बन्धित सामग्री