Shiv Sena Uddhav Thackeray Focuses on Hindutva for Mumbai Municipal Elections
Shiv Sena Uddhav Thackeray Focuses on Hindutva for Mumbai Municipal Elections
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून हिंदुत्वाचा मुद्दा लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी बैठकीत ठरले आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षाच्या माजी नगरसेवकांना यासंदर्भात तशा सूचना देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
उद्धव यांनी सांगितले की, "हिंदुत्वासाठी शिवसेना लढत आहे आणि लढत राहील. विरोधकांकडून पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला, असे आरोप केले जात आहेत, पण त्याला योग्य प्रत्त्युत्तर द्याल असे आवाहन करण्यात आले आहे.''
उद्धव यांनी आपल्या माजी नगरसेवकांना तळागाळात जाऊन काम करण्याची आणि भाजपा सारखा पक्षाची ताकद निर्माण करण्याची सूचनाही दिली. त्यांनी महापालिका निवडणुकीमध्ये भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला.
ईव्हीएमसंदर्भातील मुद्दा समोर असला तरी संघटनात्मक बांधणी आणि लोकांमध्ये पुन्हा कार्यरत होण्यावर लक्ष केंद्रित करा, असे त्यांनी सांगितले. “निवडणुका कधीही लागू शकतात, म्हणून गाफील राहू नका. जास्त ताकदीने काम करा आणि लोकांमध्ये पुन्हा जा,” असे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले. शिवसेना उद्धव ठाकरे गट आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी हिंदुत्वावर अधिक प्रभावीपणे लक्ष केंद्रित करणार असून, ही निवडणूक रणभूमीवर महत्वाची ठरणार आहे.
"निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल, मात्र महानगरपालिका निवडणूक झाल्यानंतर भाजपला जे करायचं असेल ते शिंदे बरोबर करतील. मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. सध्या सुरू असलेल्या नाट्यात शिंदे यांच्या मागे भाजपची मोठी शक्ती असून आरएसएस जरी ऍक्टिव्ह होता तरी तो पत्रक वाटण्यातच ऍक्टिव्ह होता. विधानसभा निवडणुकीतील निकाल काही लागो, मात्र महानगरपालिका आपल्याला जिंकायचीच आहे. मुंबईतील सर्व पदाधिकारी आणि गटप्रमुखांचा शिबीर लवकरच घेणार आहे असेही त्यांनी सांगितले.
उद्धव यांच्या बैठकीनंतर किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या -
उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना आदेश दिले की, त्यांनी बूथमध्ये काय काम केले आणि काय काम बाकी आहे, हे पाहावे. उद्धव यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील जनतेला आता कळत आहे की ते फसलो गेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावत म्हटले की, "२१०० रुपये ऍडव्हान्स आता द्या, लाडक्या बहिणीचे पैसे आता ऍडव्हान्स का देत नाही?" असे विचारले पाहिजे. स्वबळावर महानगरपालिका निवडणूक निर्णय घेण्याचा विचार पुढे ठेवला आहे असेही त्यांनी बजावून सांगितले, तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आई जगदंबे चरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर या प्रार्थना करतील असे त्यांनी माध्यमांना सांगितले.