मुंबई - कुर्ला : शिवसेनेचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुर्ल्यातील जेतवन उद्यानात प्रचार सभेचे उद्घाटन केले. या सभेला मोठी गर्दी जमली होती. शिंदे यांनी नारळ फोडून सभेची सुरुवात केली.
सभेदरम्यान, शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांनी, "विरोधकांचं डिपॉझिट जप्त होणार आहे." मंगेश कुडाळकर यांना "ओपनिंग बॅट्समन" म्हणत त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या विजयाचा दावा केला. शिंदे यांनी २३ तारखेच्या संदर्भातही सूचक विधान केले की, "२३ तारखेला बॉम्ब फुटणार."
मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका करताना असेही म्हटले की, "विरोधकांचा लाडक्या बहिणींना विरोध आहे." शिंदे यांनी जनतेला आश्वासन दिले की, "आम्ही दीड हजार रुपयांवर त्यापेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आणि थांबणार नाही" म्हणून आपल्या "लाडक्या बहिणींना लखपती बनवण्याची शपथच जणू मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे असे त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाले. शिंदेंनी विकासाच्या संकल्पाची ग्वाही देत मुंबईला खड्डेमुक्त करण्याचाही वादा केला.