मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाने विधानसभा निवडणुकीत उल्लेखनीय कामगिरी केली. शिवसेनेने आतापर्यंत दोन जागेवर विजय मिळवला आहे. या व्यतिरिक्त शिवसेना 54 जागांवर आघाडीवर आहे.
भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे शांतराम मोरे विजयी झाले. त्यांना एक लाख 27 हजार 205 मते मिळाली. मोरेंनी 57 हजार 962 मतांनी विजय मिळवला. भिवंडी ग्रामीणमध्ये मोरेंनी ठाकरे सेनेच्या घाटळ महादेव अंबो यांचा पराभव केला.
पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित 40 हजार 337 मतांनी विजयी झाले. त्यांना एक लाख बारा हजार 894 मते मिळाली. गावितांनी ठाकरे सेनेच्या जयेंद्र दुबळांचा पराभव केला.
शिवसेना आघाडीवर असलेल्या 54 जागा
अक्कलकुवा - आमश्या फुलजी पाडवी
चोपडा - चंद्रकांत सोनावणे
जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील
एरंडोल - अमोल पाटील
पाचोरा - किशोर पाटील
मुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील
बुलढाणा - संजय गायकवाड
रामटेक - आशिष जयस्वाल
भंडारा - नरेंद्र भोंडेकर
दिग्रस - संजय राठोड
हदगाव - बाबुराव कोहलीकर
नांदेड उत्तर - बालाजी कल्याणकर
कळमनुरी - संतोष बांगर
घनसांगी - हिकमत उधाण
जालना - अर्जुन खोटकर
सिल्लोड - अब्दुल सत्तार
कन्नड - रंजना (संजना) जाधव
औरंगाबाद मध्य - प्रदीप जयस्वाल
औरंगाबाद पश्चिम - संजय शिरसाट
पैठण - सांदिपनराव भुमरे
वैजापूर - रमेश बोरनारे
नांदगाव - सुहास कांदे
मालेगाव बाह्य - दादाजी भुसे
बोईसर - विलास तरे
कल्याण पश्चिम - विश्वनाथ भोईर
अंबरनाथ - डॉ. बालाजी प्रल्हाद किणीकर
कल्याण ग्रामीण - राजेश गोवर्धन मोरे
ओवळा - माजीवाडा - प्रताप सरनाईक
कोपरी - पाचपाखडी - एकनाथ शिंदे
मागाठाणे - प्रकाश सुर्वे
भांडुप पश्चिम - अशोक पाटील
जोगेश्वरी पूर्व - मनिषा वायकर
दिंडोशी - संजय निरुपम
अंधेरी पूर्व - मुर्जी पटेल
चांदिवली - दिलीप लांडे
चेंबूर - तुकाराम काटे
कुर्ला - मंगेश कुडाळकर
कर्जत - महेंद्र थोरवे
अलिबाग - महेंद्र दळवी
महड - भरत गोगावले
पुरंदर - विजयबापू शिवतारे
संगमनेर - अमोल खटाळ
नेवासा - विठ्ठल लंघे
परांडा - तानाजी सावंत
कोरेगाव - महेश शिंदे
पाटण - शंभुराज देसाई
दापोली - योगेश कदम
रत्नागिरी - उदय सामंत
राजापूर - किरण सामंत
कुडाळ - नीलेश राणे
सावंतवाडी - दीपक केसरकर
राधानगरी - प्रकाश आबिटकर
करवीर - चंद्रदीप नरके
कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर
खानापूर - अनिल बाबर