मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून उमेदवार यादी जाहीर करण्यात येत आहेत. नुकतीच शिवसेनेची तिसरी यादी जाहीर झाली. शिवसेनेच्या तिसऱ्या यादीत शायना एनसी यांना उमेदवारी देण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शायना एनसी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील मुरर्जी पटेल यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. त्यापाठोपाठ शायना एनसी यांचा पक्षप्रवेश झाला. शिवसेनेकडून मुंबादेवी येथून शायना यांना उमेदवारी देण्यात आली. मंगळवारी त्या त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
कोण आहेत शायना एनसी ?
शायना एनसीचे पूर्ण नाव शायना नाना चुडासामा आहे. त्या एक फॅशन डिझायनर आहेत. परंतु राजकारणाची आवड असल्याने त्यांनी राजकारणात आल्या. २००४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर लगेच भाजपाने शायना यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट जाहीर केले. वांद्रे विधानसभेसाठी बाबा सिद्दिकी यांच्याविरूद्ध त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यांनतर २००७ मध्ये त्यांची मुंबई भाजपा प्रवक्ता म्हणून निवड करण्यात आली. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, राष्ट्रीय प्रवक्ता तसेच भाजपा प्रदेश कोषाध्यक्षपदी म्हणून दोन वेळी त्यांनी काम केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी परस्पर सामंजस्यातून त्यांना भाजपाच्या मित्रपक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.