Wednesday, July 03, 2024 12:49:43 PM

Vegetable Price
शेपू ५० तर कोथिंबीर ३५ रुपयांना जुडी

उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. शेपूची जुडी ५० रुपयांना व कोथिंबीरचा भाव ३५ रुपयांवर गेला आहे.

शेपू ५० तर कोथिंबीर ३५ रुपयांना जुडी
vegetable


नवी मुंबई  : उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. शेपूची जुडी ५० रुपयांना व कोथिंबीरचा भाव ३५ रुपयांवर गेला आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांच्या आहारातून पालेभाज्या जवळपास गायब झाल्या आहेत. मुंबई, नवी मुंबईमधील नागरिकांना रोज सरासरी ४ ते ५ लाख जुडी पालेभाज्यांची गरज असते. परंतु, कडक उन्हाळा व अनेक जिल्ह्यांमध्ये पडणारा पावसामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक जवळपास निम्म्यावर आली आहे. गुरुवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त २ लाख ६७ हजार जुडी पालेभाज्यांची आवक झाली आहे.  यामध्ये १ लाख ५८ हजार जुडी कोथिंबीरचा समावेश आहे. मेथी ३७ हजार, पालक १६ हजार, पुदिना ५३ हजार व शेपूच्या फक्त २५०० जुड्यांची आवक झाली आहे. आवक घटल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत.  

        

सम्बन्धित सामग्री