Thursday, September 19, 2024 01:43:02 PM

Sheikh Hasina
शेख हसीनांचा राजीनामा, बांगलादेशमध्ये अस्थिरता

शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. याआधी त्यांनी लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे ढाका सोडले.

शेख हसीनांचा राजीनामा बांगलादेशमध्ये अस्थिरता

ढाका : शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. याआधी त्यांनी लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे ढाका सोडले नंतर विशेष विमानाने त्या दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्या. 

आरक्षणाबाबत शेख हसीना सरकारने स्वीकारलेल्या धोरणाला हिंसक पद्धतीने विरोध झाला. हिंसेची तीव्रता वाढली. देशात अस्थिरता निर्माण झाली. अखेर शेख हसीना यांनी ढाका सोडण्याचा निर्णय घेतला. शेख हसीना सुरक्षित ठिकाणी पोहचल्यानंतर पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. 

बांगलादेशचा आरक्षणाचा वाद

बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या खटल्याचा निकाल दिला. या निकालानुसार सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये स्वातंत्र्यसैनिकांसाठी पाच टक्के आरक्षण ठेवण्यात आले. आधी सरकारी नोकऱ्यांमध्ये स्वातंत्र्यसैनिकांसाठी ३० टक्के आरक्षण होते. हे आरक्षण कमी करण्याचा निर्णय शेख हसीना सरकारने घेतला होता. हेच प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला. यानंतर देशात हिंसाचार सुरू झाला. ही हिंसा अद्याप थांबलेली नाही. 

  1. भारत - बांगलादेश रेल्वे सेवा बंद
  2. ढाका विमानतळ बंद

सम्बन्धित सामग्री