Monday, September 16, 2024 10:34:46 AM

Maharashtra Politics
पवार आणि फडणवीसांची खुन्नस

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खुन्नस आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पवार आणि फडणवीसांची खुन्नस

मुंबई : शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खुन्नस आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. फडणवीस जाहीर कार्यक्रमात शरद पवारांचा आदरपूर्वक उल्लेख करतात. पण राजकीय खेळी करुन पवारांची कोंडी करतात. पवारांचे डाव त्यांच्यावरच उलटवतात. या सगळ्याचा राग काढण्यासाठीच शरद पवारांनी मराठा आरक्षणाचा डाव खेळला. या खेळीला अपेक्षित यश आले नाही. यामुळे आलेल्या नैराश्यातून पवारांनी त्यांच्या समर्थकांकरवी आता देवेंद्र फडणवीस नाही तर त्यांच्या विश्वासूंची कोंडी करण्याची धडपड सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.

खोटे गुन्हे दाखल करण्यामागे शरद पवार असल्याचा आरोप राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केला. गिरीश महाजन यांच्याविरोधात दाखल झालेल्या एका गुन्ह्यात ठोस पुरावे आढळले नाहीत पण यामागे पवार समर्थकांचा हात असल्याची माहिती तपासातून पुढे आली. यानंतर राज्याचे माजी गृहमंत्री आणि राशपचे आमदार अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात जाहीर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजनांनी खोटे गुन्हे दाखल करण्यामागे शरद पवार असल्याचा आरोप केला. 

फडणवीस, महाजनांवर खुन्नस का ?

  1. राज्यात उद्धव सरकार आल्यावर फडणवीस त्वेषाने सरकारविरोधात मैदानात उतरले. 
  2. शरद पवारांनी पूर्वीपासूनच फडणवीसांवर डूख धरला होता. 
  3. फडणवीस आणि त्यांच्या निकटवर्तीयांना अडचणीत आणण्याचा कट मविआत रचला गेला. 
  4. शरद पवारांनी या कारस्थानास्थासाठी माणसे पेरली. 
  5. त्याच कारस्थानाचा भाग म्हणून गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे ठरले. 
  6. गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. 
  7. महाजन यांना तुरुंगात टाकल्यास फडणवीस नरम पडतील असा पवारांचा कयास होता.
  8. शरद पवारांना फडणवीस, महाजन, दरेकर यांना तुरुंगात टाकायचे होते. 
  9. फडणवीस, महाजन तुरुंगात गेले की भाजपा घाबरेल असा पवारांचा कयास होता. 
  10. दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस यांनी हा तपशील विधानसभेत मांडला आहे. 
  11. वारंवार सार्वजनिक वक्तव्यातही फडणवीस यांनी शरद पवारांचे कारस्थान मांडले आहे. 

सम्बन्धित सामग्री