Thursday, April 24, 2025 10:51:25 PM

शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

राशपचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर ही भेट झाली.

शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई : राशपचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर ही भेट झाली. या भेटीत आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा होणार असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर आता शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत. 

मागील काही वर्षांपासून मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मराठा समाजाच्यावतीने मनोज जरांगे आरक्षणाची आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत आहेत. तर ओबीसींचा सरसकट प्रमाणपत्र देण्याला विरोध आहे. या मुद्यावरुन मराठा आणि ओबीसींच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी वाढू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा होणार असल्याचे समजते. 


सम्बन्धित सामग्री