Monday, July 01, 2024 03:47:05 AM

Sexual harassment in Savitribai Phule University
सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विनयभंगाचा प्रकार उघड

फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग धक्कादायक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विनयभंगाचा प्रकार उघड

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग धक्कादायक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.  नॅशनल काँग्रेस पार्टीची विद्यार्थी संघटना म्हणजेच नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया या संघटनेचा अध्यक्ष अक्षय कांबळे याने विद्यापीठात हा प्रकार केला आहे. चतुर्शिंगी पोलीस स्टेशनमध्ये अक्षय कांबळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे विद्यापीठ एन.एस.यु.आय. अध्यक्ष अक्षय कांबळे याने अनेक विद्यार्थिनींना संदेश पाठवून त्रास दिला आहे. त्याने नुकतेच एका विद्यार्थिनीला केलेल्या संदेशामुळे तिला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. संबंधित विद्यार्थिनीने या सर्व घटनेची पोलिसांमध्ये तक्रार केली असता पोलीस प्रशासनाने या विद्यार्थ्यावर विनयभंग आणि विद्यार्थिनीला छळ केल्याचे गुन्हा दाखल केला आहे. संबंधित विद्यार्थ्यावर विद्यापीठ प्रशासनानेही कारवाई करावी, असे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून पुणे सचिवांना देण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री