Saturday, September 21, 2024 04:54:18 AM

Supreme Court
कोलकाता बलात्कार प्रकरणी 'सर्वोच्च' सुनावणी

कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात २० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

कोलकाता बलात्कार प्रकरणी सर्वोच्च सुनावणी

नवी दिल्ली : कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात २० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड, न्यायाधीश जमशेद बुर्जोर परडीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्रा या तीन न्यायाधीशांच्या  खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. 

याआधी कोलकाता उच्च न्यायालयाने महिला डॉक्टर प्रकरणी सीबीआयला तपास करण्याचे आणि वेळोवेळी उच्च न्यायालयाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांनुसार सीबीआयने तपास सुरू केला आहे. सीबीआयच्या पथकाने घटनास्थळाचा थ्री डी लेझर मॅपिंग तंत्राच्या मदतीने एक नकाशा तयार केला आहे. तपास सुरू आहे. 

प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह ९ ऑगस्ट २०२४ रोजी आढळला. या प्रकरणी सीबीआय तपासाचे निर्देश उच्च न्यायालयाने १३ ऑगस्ट रोजी दिले. सीबीआयने १४ ऑगस्टपासून तपास सुरू केला. यानंतर १६ ऑगस्ट रोजी जमावाने आर. जी. कर रुग्णालयावर हल्ला केला. या हल्ल्यामागे पुरावे नष्ट करण्याचा हेतू असावा असा संशय व्यक्त होत आहे. 

                       

सम्बन्धित सामग्री