Tuesday, July 02, 2024 08:18:28 AM

Sant Dnyaneshwar
ज्ञानोबा माउलींचे प्रस्थान

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान शनिवार २९ जून रोजी आळंदी येथून झाले. कळस हलताच माउलींच्या पालखीचे प्रस्थान झाले. 'ज्ञानोबा माउली तुकाराम'च्या जयघोषात पालखीचे प्रस्थान सुरू झाले.

ज्ञानोबा माउलींचे प्रस्थान

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान शनिवार २९ जून रोजी आळंदी येथून झाले. कळस हलताच माउलींच्या पालखीचे प्रस्थान झाले. 'ज्ञानोबा माउली तुकाराम'च्या जयघोषात पालखीचे प्रस्थान सुरू झाले. 

यंदा आळंदी गावातील सहादू बाबुराव कुऱ्हाडे यांच्या बाजी आणि हौश्या या बैलजोडीला मानाचा पालखी रथ ओढण्याचा बहुमान मिळाला आहे. कुऱ्हाडे कुटुंबाला तब्बल २५ वर्षानंतर हा मान मिळाला आहे. माउलींचा पहिला मुक्काम आळंदी येथेच दर्शन मंडप इमारत गांधीवाडा येथे असेल. ज्ञानोबा माउलींची पालखी ३० जून रोजी आळंदीहून पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ होईल. ही पालखी १५ जुलैला वाखरीला पोहचणार आहे. पालखीचा १६ जुलैला वाखरी ते पंढरपूर असा प्रवास होईल. नियोजनानुसार १७ जुलै रोजी मुख्य आषाढी एकादशी पंढरपूर यात्रेचा सोहळा असणार आहे. माउलींची पालखी २० जुलैपर्यंत पंढरपूर नगरीत राहील. पालखी २१ जुलै रोजी परतीच्या प्रवासासाठी आळंदीकडे निघणार आहे.

ज्ञानोबा माउलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण ८ जुलैला लोणंदमध्ये तर १५ जुलैला बाजीरावाची विहीर येथे होईल. माउलींच्या पालखीचे तिसरे उभे रिंगण १६ जुलैला वाखरी येथे होईल. माउलींच्या पालखी सोहळ्याचे गोल रिंगण १२ जुलैला पुरंदवडेत, १३ जुलैला खुडुस फाटा, १४ जुलैला ठाकुरबुवाची समाधी आणि १५ जुलैला बाजीरावाची विहीर येथे होईल. बाजीरावाची विहीर येथे उभे आणि गोल असे दोन्ही प्रकारचे रिंगण १५ जुलैला होणार आहे.

ज्ञानोबांनी दिला संकेत
कळस हलताच माउलींच्या पालखीचे प्रस्थान
'ज्ञानोबा माउली तुकाराम'चा जयघोष


सम्बन्धित सामग्री