Saturday, September 28, 2024 03:51:21 PM

Sanjay Raut
संजय राऊत अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी

भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करुन बदनामी केल्याप्रकरणी शिउबाठाचे संजय राऊत दोषी ठरले. न्यायालयाने संजय राऊत यांना पंधरा दिवसांच्या तुरुंगवासाची आणि २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली

संजय राऊत अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी

मुंबई : भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करुन बदनामी केल्याप्रकरणी शिउबाठाचे संजय राऊत दोषी ठरले. न्यायालयाने संजय राऊत यांना पंधरा दिवसांच्या तुरुंगवासाची आणि २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. भाजपाच्या किरीट सोमैया यांची पत्नी मेधा किरीट सोमैया यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अब्रुनुकसानी केल्याप्रकरणी याचिका केली होती. या खटल्यात माझगाव न्यायालयाने भादंवि ५०० अंतर्गत संजय राऊत यांना दोषी ठरवले. 

मिरा भाईंदर येथे मेधा किरीट सोमैया यांनी शौचालय घोटाळा केला असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. तर 'हा आरोप खोटा आहे. एक रुपयाचाही भ्रष्टाचार झालेला नाही'; असे मेधा किरीट सोमैया म्हणाल्या. त्यांनी आरोप खोडून काढतानाच संजय राऊत यांच्या विरोधात अब्रुनुकसानी केल्याप्रकरणी खटला दाखल केला होता. या खटल्यात दोषी ठरलेल्या राऊत यांनी माझगाव न्यायालयातूनच १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळवला. जामीन मिळाल्यावर बाहेर येऊन राऊतांनी गंभीर आरोप केला. निवडणुकीच्या तोंडावर अटक करण्याचा डाव होता, असे राऊत म्हणाले. 

याआधी प्रा. डॉ. मेधा किरीट सोमैया यांनी १०० कोटींच्या शौचालय घोटाळ्याच्या नावाखाली छळ आणि बदनामी केल्याबद्दल संजय राऊत यांच्याविरुद्ध मुंबई येथील शिवडी न्यायालयात १०० कोटींचा मानहानीचा खटला  केला होता  याच्या आधी प्रा. डॉ. मेधा किरीट सोमैया यांनी राऊतांविरोधात मुलुंडमधील नवघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. मिरा भाईंदरमध्ये एकूण १५४ सार्वजनिक शौचालयांपैकी १६ शौचालयाचे बांधकाम करण्याचे कंत्राट सोमैयांच्या पत्नी मेधा सोमैया यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. युवक प्रतिष्ठानने बनावट कागदपत्रे देऊन मिरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केली. तसेच साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. हा मुद्दा आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत उपस्थित केल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. याबाबतचा अहवाल महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी शासनाला सादर केला होता.

  1. राऊत १५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटले 
  2. संजय राऊतांना दंडाधिकारी न्यायालयाकडून जमीन मंजूर
  • 'संजय राऊतांकडून महिलेची बदनामी'
  • महिलेच्या बदनामीप्रकरणी संजय राऊत दोषी
  • शिवडी न्यायालयाचा धमाकेदार निर्णय

काय आहे प्रकरण ?

  1. मेधा किरीट सोमैया यांनी शौचालय घोटाळा केला - संजय राऊत
  2. राऊत, आरोप सिद्ध करा - मेधा किरीट सोमैया
  3. आरोपांचे पुरावे द्या - किरीट सोमैया
  4. कोणतेही पुरावे न दिल्यानं मेधा सोमैया यांनी राऊतांवर १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला.
  5. संजय राऊतांना न्यायालयानं मानहानीप्रकरणी नोटीस बजावली. 
  6. मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. 
  7. आरोपांचे पुरावे न देणाऱ्या राऊतांनी केवळ बदनामीसाठी वक्तव्य केलं - किरीट
  8. महिलेच्या बदनामीप्रकरणी राऊत दोषी, १५ दिवसांची कैद, २५ हजारांचा दंड - न्यायालय
  • जामिनावर सुटल्यानंतर राऊतांचे न्यायालयावरच आरोप 
  • 'निवडणुकीपूर्वी मला तुरुंगात टाकण्याचे षड्यंत्र'
  • संजय राऊतांनी न्यायालयाच्या विरोधात केलं वक्तव्य

सम्बन्धित सामग्री