Wednesday, August 21, 2024 06:40:52 PM

samvidhan hatya diwas
संविधान हत्या दिन

देशात दरवर्षी २५ जून रोजी संविधान हत्या दिवस पाळला जाईल.

संविधान हत्या दिन

नवी दिल्ली : देशात दरवर्षी २५ जून रोजी संविधान हत्या दिवस पाळला जाईल. भारतात २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू झाली होती. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारने ही आणीबाणी देशावर लादली होती. आणीबाणीचे वर्णन लोकशाहीच्या आत्म्याचा गळा घोटणारा दिवस असे केले जाते. हा दिवस आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्यांच्या योगदानाची आठवण करून देईल, असे केंद्र सरकारने आदेशात नमूद केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्स पोस्ट करुन ही माहिती दिली. 

देशात २५ जूनला संविधान हत्या दिन पाळला जाईल
काँग्रेस सरकारने २५ जून १९७५ रोजी लागू केली आणीबाणी
आणीबाणीचा निषध करण्यासाठी केंद्राचा निर्णय

संविधान हात्या दिवस.


सम्बन्धित सामग्री