Wednesday, October 02, 2024 04:48:35 PM

Samruddhi adjacent development to MSRDC
'समृद्धी' लगतचा विकास 'एमएसआरडीसी'कडे

महामार्गालगतच्या गावांमध्ये विकासाची संधी निर्माण झाली असून त्यासाठी एमएसआरडीसीने १८ कृषी समृध्द नवनगरे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

समृद्धी लगतचा विकास एमएसआरडीसीकडे

मुंबई : महामार्गालगतच्या गावांमध्ये विकासाची संधी निर्माण झाली असून त्यासाठी एमएसआरडीसीने १८ कृषी समृध्द नवनगरे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत भिवंडी तालुक्यातील ४६ गावांचा विकास आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून केला जाणार आहे. आमणे, आतकोली, भादाणे, भोईरगावसह ४६ गावांसाठी एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गावांचा विकास कसा होणार?

  • एमएसआरडीसीची ४६ गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती
  • या गावांच्या औद्याोगिक विकासासाठीची एमआयडीसीचे विशेष नियोजन
  • एमएसआरडीसीने १८ कृषी समृध्द आणि औद्योगिक नवनगरे विकसित करणार 

 


सम्बन्धित सामग्री