नाशिक : राशपचे मुंबई अध्यक्ष आणि मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. पण महायुतीत ही जागा शिवसेनेकडे आहे आणि सेनेकडून सुहास कांदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे समीर भुजबळ नाराज आहेत. ते निवडणूक लढवण्यासाठी हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे. छगन भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळ विधान परिषदेवर आमदार झाले आहेत. आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधीच त्यांचा शपथविधी झाला. पण समीर भुजबळ नाराज झाले आहेत. त्यांनी बंड केले तर हा राशपसाठी धक्का असेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.