Thursday, September 19, 2024 05:40:02 AM

Vande Bharat Fact Checks
तृणमूलच्या खासदाराने पसरवली अफवा, रेल्वे मंत्रालयाने घेतली शाळा

तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार साकेत गोखले यांची एक्स पोस्ट वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

तृणमूलच्या खासदाराने पसरवली अफवा रेल्वे मंत्रालयाने घेतली शाळा

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार साकेत गोखले यांची एक्स पोस्ट वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. वंदे भारत स्लीपर कोचच्या निर्मिती खर्चात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आधी २९० कोटीत तयार होणार असलेली वंदे भारत ४३६ कोटी रुपयांत होणार आहे. खर्चात वाढ करताना वंदे भारतच्या डब्यांमध्ये लक्षणीय घट केल्याचा दावा साकेत गोखलेंनी केला.

साकेत गोखलेंच्या या दाव्याला रेल्वे मंत्रालयाने एक्स पोस्ट करुन फेटाळले. आधीच्या करारानुसार १६ डब्यांच्या २०० वंदे भारत गाड्या तयार होणार होत्या. आता नव्या करारानुसार २४ डब्यांच्या १३३ वंदे भारत गाड्या तयार होणार आहेत. जुन्या करारामुळे ३२०० डबे तयार होणार होते. नव्या करारामुळे ३१९२ डबे तयार होणार आहेत. या स्लीपर कोच गाड्या तयार करताना डब्यांच्या निर्मिती खर्चाला नियंत्रणात ठेवण्यात आले आहे. गाड्यांची लांबी वाढल्यामुळे खर्च नियंत्रणात राखण्यास मदत झाली आहे. संपूर्ण व्यवहारात पारदर्शकता आहे. यात कुठेही भ्रष्टाचार झालेला नाही. रेल्वे १२ हजार नॉन एसी अर्थात विना वातानुकूलित डबे तयार करत आहे; असेही रेल्वे मंत्रालयाने सांगितले.

  1. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार साकेत गोखले यांची एक्स पोस्ट वादाच्या भोवऱ्यात
  2. 'वंदे भारत स्लीपर कोचच्या निर्मिती खर्चात ५० टक्क्यांनी वाढ'
  3. 'आधी २९० कोटीत तयार होणार असलेली वंदे भारत ४३६ कोटीत'
  4. साकेत गोखलेंनी केला दावा
  5. रेल्वे मंत्रालयाने फेटाळला साकेत गोखलेंचा दावा
  6. जुना करार १६ डब्यांच्या २०० वंदे भारत गाड्यांचा, एकूण डबे ३२००
  7. नवा करार २४ डब्यांच्या १३३ वंदे भारत गाड्यांचा, एकूण डबे ३१९२
  8. रेल्वे मंत्रालयाने दिली माहिती


सम्बन्धित सामग्री