सांगली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांवर राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्याकडून 'पैशांचा पाऊस' पाडला जाऊ नये, यासाठी निवडणूक आयोग लक्ष ठेवत आहे. त्याच वेळी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात गदिमा पार्क समोरुन जाणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून पाचशे रुपयांच्या नोटा वाहून आल्या आहेत. ओढ्यामध्ये लाखो रुपयांची रोकड सापडली. ओढ्यात पाचशे - पाचशेच्या हजारो नोटा सापडल्या. या नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. या नोटा खऱ्या असल्याचा दावा केला जात आहे, मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या नोटा कोणाच्या आहेत, ओढ्यात कुठून आल्या, याचा शोध घेतला जात आहे.