नाशिक : नाशिक वनी सप्तशृंगी गड परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. या मुसळधार पावसाने गडावर जाणारे रस्ते जलमय झाले आहेत. घाटमाथ्याहून जाणाऱ्या रस्त्यावर कोसळणारे धबधबे आणि रस्त्यावर वाहणारे पाणी यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अवघा अर्धा ते पाऊण तास पाऊस पडल्याने स्थिती निर्माण झाली आहे.