Friday, June 28, 2024 09:17:01 PM

Risk of fatal heat has increased by 35 times
जीवघेण्या उष्णतेचा धोका वाढलाय ३५ पटीने शास्त्रज्ञांनी अभ्यास

सर्वांची चिंता वाढवणारा अहवाल समोर आला आहे.

जीवघेण्या उष्णतेचा धोका वाढलाय ३५ पटीने शास्त्रज्ञांनी अभ्यास

वॉशिंग्टन : सर्वांची चिंता वाढवणारा अहवाल समोर आला आहे. गेली अनेक वर्षे वाढत असलेल्या तापमानवाढीमुळे जीवघेणी गरमी वाढण्याचे प्रमाण तब्बल ३५ पट वाढल्याचे जागतिक तापमानवाढीबाबत अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञांच्या गटाने केलेल्या अभ्यासात पुढे आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात भारतात तसेच जगाच्या इतर भागात मिळून हजारो लोकांचे बळी गेले आहेत. अहवालात असेही म्हटले आहे की, चालू वर्ष आजवरचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील बहुतेक प्रदेशांमध्ये पावसाळ्याचे आगमन होण्याच्या आधीच भीषण उष्णतेचा प्रकोप झालेला पहायला मिळतो.

 

या अभ्यासासाठी वर्ल्ड वेदर अॅट्रिब्युशन (डब्ल्यूडब्ल्यूए) नेटवर्कने मेक्सिको, दक्षिण पश्चिम अमेरिका, ग्वाटेमाला, बेलीज, अल साल्वाडोर आणि होंडुरास देशांची निवड केली होती. डब्ल्यूडब्ल्यूए यात उत्तर गोलार्धातील सर्वाधिक उष्ण पाच दिवस आणि पाच रात्रीचा अभ्यास केला. जीवाष्म जाळल्याने निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे जागतिक तापमानात वाढ वेगाने होत असल्याचा निष्कर्ष पाहणीतून काढण्यात आला आहे. ग्लोबल वाढीसाठी कारणीभूत ठरणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सर्व देशांच्या सरकारने विविध उपाययोजना केल्या पाहिजेत.


सम्बन्धित सामग्री