मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांचा आलेख सतत वर-खाली राहिला आहे. राज्यात 1962 च्या निवडणुकीत काँग्रेसचा स्टाईक रेट सरासरी 81 टक्के राहिला होता. तोच 2014 मध्ये घसरून तब्बल १५ टक्क्यांवर आला होता. तर 1980 मध्ये 10 टक्के असलेला भाजपाचा सरासरी स्ट्राईक रेट 2019 च्या निवडणुकीत तब्बल 64 टक्क्यांवर गेल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. शिवसेनेचा स्ट्राईक रेटही सतत बदलता राहीला असून त्यांचा टक्क्यांमध्येही चढ-उतार पाहायला मिळाला आहे. अन्य पक्षांनाही त्यांचा आलेख वाढवता आलेला नाही.
पाहुयात राजकीय पक्षांची कामगिरी...
पक्षनिहाय कामगिरी
- काँग्रेस - 30 (1999), 44 (2004), 48 (2009), 15 (2014), 30 (2019)
- भाजपा - 48 (1999), 49 (2004), 39 (2009), 47 (2014), 64 (2019)
- शिवसेना - 43 (1999), 38 (2004), 28 (2009), 22 (2014), 45(2019)
- राष्ट्रवादी - 26 (1999), 57 (2004), 55 (2009), 15 (2014), 44 (2019)
- इतर - 08 (1999), 05 (2004), 07 (2009), 02 (2014), 04 (2019)