Wednesday, April 23, 2025 08:27:04 AM

गिरणा नदीत अडकलेल्यांची सुटका

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील गिरणा नदीत अडकलेल्या मच्छीमारांची सुटका करण्यात आली आहे.

गिरणा नदीत अडकलेल्यांची सुटका

मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील गिरणा नदीत अडकलेल्या मच्छीमारांची सुटका करण्यात आली आहे. गिरणा नदीच्या पुरात अडकलेल्या बारा जणांना अग्निशमन पथक आणि स्थानिकांनी वाचवले. पुराच्या पाण्यात अडकलेले मच्छीमार एका खडकावर जाऊन थांबले होते. या खडकावरुन सर्व मच्छीमारांना सुरक्षितरित्या वाचवून नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. 

सलग काही दिवस संततधार पाऊस सुरू असल्यामुळे गिरणा नदीला पूर आला. पुरामुळे मासेमारीसाठी नदीपात्रात गेलेले मच्छीमार संकटात सापडले होते. मच्छीमारांनी नदीपात्रावरील खडकावर आश्रय घेतल्यामुळे ते सुरक्षित होते.


सम्बन्धित सामग्री