Monday, July 01, 2024 12:54:22 AM

Amravati
अमरावतीत नवनीत राणांचा पराभव का ?

गेल्यावेळी अपक्ष लढलेल्या नवनीत राणा यांनी यावेळेस कमळाच्या चिन्हावर लोकसभा लढली...

अमरावतीत नवनीत राणांचा पराभव का

अमरावती : देशभरात लोकसभा निवडणुका संपन्न झाल्या...४ जून रोजी त्याचा निकाल लागला...आणि या निकालात मोदी आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही...मोदी आघाडीला सर्वाधिक नुकसान हे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात झाले आहे...राज्यामध्ये ४८ पैकी ४५ जागा निवडून येणारच असा दावा महायुतीने केला होता...तो फोल ठरत महायुतीला राज्यात अवघ्या १७ जागांवर समाधान मानावे लागले आहे...अनेक मातब्बरांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला...

त्यापैकीच एक म्हणजे अमरावतीत नवनीत राणा यांचा झालेला पराभव..अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी भाजपात प्रवेश केला होता...आणि गेल्यावेळी अपक्ष लढलेल्या नवनीत राणा यांनी यावेळेस कमळाच्या चिन्हावर लोकसभा लढली...त्यांच्याविरोधात काँग्रेसचे बळवंत वानखेडे होते...आणि वानखेडेंनी राणांना पराभूत करत अमरावतीच्या खासदारपदावर आपले नाव कोरले...
दरम्यान हा निकाल आपण आकडेवारीसहीत पाहुयात....

बळवंत वानखेडे काँग्रेस - ५,२६,२७१
नवनीत राणा भाजपा - ५,०६,५४०
किती मतांनी विजयी - १९,७३१

स्थानिक भाजपा नवनीत राणा यांच्या पाठीशी ?
भाजपा आणि कडू यांच्याशी वाद भोवला ?
मराठा समाज विरोधात का गेला ?
विधानसभेसाठी राणांची योजना काय ?
शिवसेना आणि राष्ट्रवादीने नवनीत राणा यांचे काम केले ?

नवनीत राणा यांच्यासाठी ही लोकसभा तितकीशी सोप्पी नव्हती...त्यांच्या पराभवासाठी कारणीभूत असलेल्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे प्रहारने घेतलेली भूमिका...बच्चू कडू यांच्या प्रहारने अमरावतीतून दिनेश बूब यांना उमेदवारी दिली होती....
प्रहार हा खरंतर महायुतीचा घटक आहे...मात्र बच्चू कडू आणि राणा यांच्यामध्ये वैर असल्याच्या चर्चा आहेत...आणि त्याचमुळे लोकसभेसाठी प्रहारने नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार दिला.....त्यामुळे दिनेश बूब यांनी महायुतीची मतं घेतली...

अमरावतीचा निकाल कुणाचा ? अमरावती मतदारसंघातल्या सहा विधानसभा क्षेत्रात मतदानाची टक्केवारी किती आहे आणि तिथे सध्या विद्यमान आमदार कोण आहेत आणि त्यांचा पक्ष कोणता ?

अचलपूर बच्चू कडू प्रहार

अमरावती सुलभा खोडके काँग्रेस

बडनेरा रवी राणा अपक्ष

दर्यापूर बळवंत वानखेडे काँग्रेस
 
मेळघाट राजकुमार पटेल प्रहार

तिवसा यशोमती ठाकूर काँग्रेस


सम्बन्धित सामग्री