Saturday, October 05, 2024 02:33:55 PM

Ravindra Waikar
वायकरांना मुंबई पोलिसांचा दिलासा

मुंबई पोलिसांनी वायकरांविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेतले आहेत.

वायकरांना मुंबई पोलिसांचा दिलासा

मुंबई : जोगेश्वरीतील भूखंड घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने वायकरांविरोधात ठोस पुरावे नसल्याचे सांगितले. गैरसमजातून, चुकीच्या माहितीवरुन या प्रकरणात मुंबई महापालिकेन त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला,' असा निष्कर्ष आर्थिक गुन्हे शाखेनं काढला आहे. मुंबई पोलिसांनी वायकरांविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेतले आहेत.

उद्धव यांच्या नेतृत्वात मविआ सरकार असताना वायकरांवर भूखंड घोटाळ्याचे आरोप झाले. सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड लाटून त्यावर पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा घाट घालून ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणात आझाद मैदान पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल झाला. तपास सुरू झाला आणि वायकरांनी काही आठवड्यांनंतर शिवसेनेत प्रवेश केला. नंतर ते शिवसेनेच्या तिकिटावर वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले, खासदार झाले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी वायकरांविरुद्धचे गुन्हे मागे घेतले आहेत. 


सम्बन्धित सामग्री