मुंबई : रविकांत तुपकरांना बुलढाणा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पिकविम्यासाठी रविकांत तुपकरांचे बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षकांच्या दालनात आंदोलन सुरू होते. मला गोळ्या घातल्या तरी शेतकऱ्यांसाठी लढत राहणार आहे. सरकारच्या हुकूमशाहीचा निषेध असे रविकांत तुपकरांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा मागणाऱ्या रविकांत तुपकरांवर गुन्हा दाखल करता, मग शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल का करत नाही असा सवाल शर्वरी तुपकरांनी विचारला आहे. त्याचबरोबर गावोगावी आंदोलन सुरू करा असेही रविकांत तुपकरांनी म्हटल्याचे दिसून येते.