Wednesday, November 20, 2024 12:31:45 AM

Ram Kulkarni
'महाविकास आघाडीत बिघाडी'

विधानसभेच्या जागा वाटपावरून मविआत नाराजी नाट्याला सुरूवात झाली आहे.

महाविकास आघाडीत बिघाडी

मुंबई : विधानसभेच्या जागा वाटपावरून मविआत नाराजी नाट्याला सुरूवात झाली आहे. यातूनच मविआच्या अंतर्गत नाट्याच्या पहिला अंकाला सुरूवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात  धुसफूस चव्हाट्यावर येऊन निवडणुकीच्या तोंडावर कुठल्याही क्षणी राजकीय भुकंप होऊ शकतो. कारण विदर्भात शिउबाठाने पाय ठेऊ नये याची पूर्ण तयारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करत आहेत. त्यामुळे पटोले आणि संजय राऊत यांच्यात सुरू झालेले तु-तु-मै भूकंपाचा पहिला अंक असल्याचा दावा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला. विदर्भाच्या जागा वाटपाची चर्चा सुरू असताना बैठकीतून उठून बाहेर जाण्यापर्यंत जेव्हा गोष्ट पोहोचते. तेव्हा  प्रदेश काँग्रेसला शिउबाठा नको असल्याचे सिद्ध होते अशी टीका कुलकर्णी यांनी केली. 

पुढे कुलकर्णी म्हणाले, शिउबाठाला विदर्भात पाय न ठेऊ देण्याचा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे. हे सगळं पाहता कुठल्याही क्षणी महाविकास आघाडीत भूकंप होऊ शकतो आणि उद्धव ठाकरे बाहेर पडू शकतात. शिउबाठाची प्रदेश काँग्रेसला सोडून केंद्रातील राहुल गांधींची वाढत असलेली सलगी प्रदेश काँग्रेसला मान्य नसल्याने महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होऊ शकतो हे त्रिवाद सत्य असल्याचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

 

 

        

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo