मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी झाली आहे. उमेदवारी मिळणार की नाही याचा अंदाज घेऊन नेते या पक्षातून त्या पक्षात जाण्याचे प्रकार वाढले आहेत. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांच्या राशपमध्ये प्रवेश केला. आहे. शिंगणेंनी राशपमध्ये जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.