Sunday, September 29, 2024 03:05:28 AM

Asha Parekh
आशा पारेख यांना राज कपूर जीवनगौरव

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सन २०२३ साठीचा स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर झाला.

आशा पारेख यांना राज कपूर जीवनगौरव

मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सन २०२३ साठीचा स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना जाहीर झाला आहे. स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, संकलक एन.चंद्रा आणि चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी या पुरस्कारांची घोषणा केली. दिनांक २१ ऑगस्ट रोजी एका विशेष समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप रुपये १० लाख, मानपत्र व मानचिन्ह असे असून  स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप रुपये ६ लाख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे.  चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप रुपये १० लाख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे. तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप रुपये ६ लाख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे. 

पुरस्कार वितरण समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवार, दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी, सायंकाळी ७ वाजता एनएससीआय (NSCI) डोम, वरळी मुंबई येथे होणार आहे. 


सम्बन्धित सामग्री