Friday, July 05, 2024 08:33:15 PM

Rainfall expected to be above average in July
जुलैमध्ये पाऊस सरासरीपेक्षा १०६ टक्के बरसण्याचा अंदाज

जुलै महिन्यात १०६ टक्के पावसाची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.

जुलैमध्ये पाऊस सरासरीपेक्षा १०६ टक्के बरसण्याचा अंदाज

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात अद्याप पावसाने म्हणावी तशी बॅटिंग सुरू केली नसली, तरी राज्यात बहुतांशी ठिकाणी तो धो धो कोसळत आहे. आता राज्यात चालू महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के पाऊस पडेल, आशा आहे. राज्याच्या कोणत्याही जिल्ह्यात जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता नाही. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, उत्तर रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, पश्चिम सातारा, पूर्व सोलापूर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात जुलै महिन्यात १०६ टक्के पावसाची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.  

           

सम्बन्धित सामग्री