Friday, September 06, 2024 08:51:04 AM

Rain in Mumbai
मुंबई महानगर क्षेत्रात पावसाचा जोर

मुंबई महानगर क्षेत्रात अर्थात एमएमआरमध्ये पावसाने जोर धरला आहे. सखल भागात पाणी साचले आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेची वाहतूक मंदावली आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात पावसाचा जोर

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात अर्थात एमएमआरमध्ये पावसाने जोर धरला आहे. सखल भागात पाणी साचले आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेची वाहतूक मंदावली आहे. रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. शनिवार असल्यामुळे अनेकांना सुटी आहे. पण सकाळीच कामावर निघालेल्यांची पंचाईत झाली. दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे शक्य असल्यास घरी थांबा, बाहेर पडणे टाळा; असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

शनिवार - रविवारच्या सुटीचा विचार करुन पर्यटनासाठी निघालेले पावसाने सुखावले. मुंबई जवळच्या काही पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी आहे. अलिकडेच झालेल्या दुर्घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटकांनी नियमांचे पालन करावे आणि सहकार्य करावे; असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पाणी साचले आहे. यामुळे बाजार समितीतल्या कामकाजावर परिणाम झाला आहे. 

  1. रत्नागिरी आणि गडचिरोलीला पावसाचा रेड अलर्ट (लाल रंगाचा दक्षतेचा इशारा)
  2. ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, नागपूर, अमरावती या ९ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट (केशरी रंगाचा दक्षतेचा इशारा)
  3. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात आणि पालघरमध्ये पावसाचा यलो अलर्ट (पिवळ्या रंगाचा दक्षतेचा इशारा)

सम्बन्धित सामग्री