Wednesday, September 18, 2024 02:21:04 AM

Rain
महाराष्ट्रात एकूण १०२५.४ मिमी पाऊस

भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार राज्यात १ जून २०२४ ते ४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ३६ पैकी २५ जिल्ह्यांमध्ये दीर्घ कालावधीच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला

महाराष्ट्रात एकूण १०२५४ मिमी पाऊस

मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार राज्यात १ जून २०२४ ते ४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ३६ पैकी २५ जिल्ह्यांमध्ये दीर्घ कालावधीच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या कालावधीत महाराष्ट्रात एकूण १०२५.४ मिमी पाऊस झाला आहे. हिंगोली या एकमेव जिल्ह्यामध्ये सरासरीच्या तुलनेत ३१ टक्के कमी पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ७९ टक्के आणि सांगलीमध्ये ७२ टक्के इतका जास्त पाऊस झाला. इतर २३ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २० टक्के ते ५९ टक्के जास्त पाऊस झाला. 

लातूरमध्ये ५९ टक्के जास्त अतिवृष्टी, पुण्यात ५५ टक्के जास्त अतिवृष्टी, जळगावात ५० टक्के जास्त अतिवृष्टी, नाशिक आणि बीडमध्ये ४८ टक्के जास्त अतिवृष्टी, धुळ्यात ४७ टक्के जास्त अतिवृष्टी, कोल्हापुरात ४६ टक्के जास्त अतिवृष्टी, परभणीत ४५ टक्के जास्त अतिवृष्टी झाली. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत सामान्य पाऊस झाला आहे.


सम्बन्धित सामग्री