Sunday, September 29, 2024 02:13:55 AM

Rahul Gandhi
राहुल अखेर संसदीय जबाबदारी स्वीकारणार

राहुल गांधी अखेर संसदीय जबाबदारी स्वीकारणार आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडीच्या बैठकीत राहुल यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.

राहुल अखेर संसदीय जबाबदारी स्वीकारणार

नवी दिल्ली : राहुल गांधी अखेर संसदीय जबाबदारी स्वीकारणार आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडीच्या बैठकीत राहुल यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. या निवडीची घोषणा काँग्रेसच्या के. सी. वेणुगोपाल यांनी केली. याआधी वाजपेयी सरकारच्या काळात १३ ऑक्टोबर १९९९ ते ६ फेब्रुवारी २००४ या काळात सोनिया गांधी विरोधी पक्षनेत्या होत्या. 

मोदी सरकारला पहिल्या दोन कार्यकाळात विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढ्या जागा नव्हत्या. यामुळे मे २०१४ ते जून २०२४ दरम्यान लोकसभेत विरोधी पक्षनेताच नव्हता. अखेर जून २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात लोकसभेसाठी विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा झाली आहे. 

काँग्रेसची सत्ता असताना राहुल गांधी यांनी मंत्रिपद स्वीकारणे टाळले होते. पण मनमोहन सिंह सरकारने केलेल्या कायद्याचे कागद फाडून स्वतःच्या राजकीय समजुतीची चुणूक देशाला दाखवून दिली होती. यामुळे विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी कसे काम करणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. 
 


सम्बन्धित सामग्री