पुणे : पुणे पोलिसांनी राज्यातील विविध शहरांमधून बेपत्ता झालेल्या मुलांसह महिलांचा शोध घेण्यासाठी 'ऑपरेशन मुस्कान – १३' मोहिमेची सुरुवात केली आहे. ही विशेष मोहीम १ ते ३० डिसेंबर दरम्यान राबवली जाईल.
पोलीस विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा आणि सर्व पोलीस ठाण्यांमध्ये विशेष पथकांची स्थापना करण्यात येणार आहे. या पथकाच्या माध्यमातून पुणे शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये समन्वय साधला जाईल, जेणेकरून बेपत्ता झालेल्या मुलांचा आणि तरुणींचा शोध प्रभावीपणे घेता येईल.
प्रत्येक पथकात एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक सहायक निरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. ही मोहिम पुणे शहर आणि परिसरातील बेपत्ता मुलं व तरुणींना शोधण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करणार आहे.