Friday, June 28, 2024 08:28:15 PM

Pune Hit & Run Case
पुणे अपघात, ३ आरोपींना पोलीस कोठडी

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी तीन आरोपींना २४ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुण्याच्या सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

पुणे अपघात ३ आरोपींना पोलीस कोठडी

पुणे : पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी तीन आरोपींना २४ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुण्याच्या सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

आरोपी - वेदांत अगरवाल - वय १७ वर्षे ८ महिने - बाल हक्क न्यायमंडळाचा निकाल अपेक्षित
आरोपी - विशाल अगरवाल, वेदांतचे वडील - २४ मे पर्यंत पोलीस कोठडी
आरोपी - बार मालक जयेश बोनकर - २४ मे पर्यंत पोलीस कोठडी - अल्पवयीन आरोपीला दारू देणे
आरोपी - बार मालक जितेश शेवनी - २४ मे पर्यंत पोलीस कोठडी - अल्पवयीन आरोपीला दारू देणे

काय आहे पोर्शे अपघात प्रकरण ?

पुण्यात पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले. अपघात करून पळून जाणाऱ्याला स्थानिकांनी पकडले आणि पलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात तरुण तरुणीचा मृत्यू झाला तर अपघात करणाऱ्या १७ वर्ष ८ महिन्यांच्या वेदांत अगरवालला पोलिसांनी पकडले. वेदांत विरोधात कलम ३०४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. पुणे पोलिसांनी आरोपीला प्रौढ समजून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. पण बाल हक्क न्यायालयाने वेदांतला जामीन दिला. या निर्णयाविरोधात पुणे पोलिसांनी कायद्यातील तरतुदीनुसार बाल हक्क न्यायालयात दाद मागितली आहे. बाल हक्क न्यायालयाने पोलिसांची बाजू ऐकून घेतली पण अद्याप निर्णय दिलेला नाही.

विशाल अगरवालवर शाईफेक

पुण्यात घडलेल्या पोर्शे अपघात प्रकरणी नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. याच संतापातून पुणे सत्र न्यायालयाच्या आवारात विशाल अगरवालवर शाईफेक करण्याचा प्रकार घडला.

काय म्हणाले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ?

दारू पिऊन गाडी चालवणे, परवाना नसताना गाडी चालवणे, नोंदणी नसलेले वाहन रस्त्यावर आणणे आणि चालवणे, अपघात करून पळून जाणे हे गंभीर गुन्हे आहेत. या प्रकरणात कठोर कारवाई शक्य - गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

आरोपी जरी अल्पवयीन असला तरी घडलेला गुन्हा आणि त्याचे अठरा वर्षाजवळ पोहोचलेले वय पाहता, कठोर कारवाई व्हावी अशीच पुणे पोलिसांची भूमिका - गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

पोर्शे अपघातानंतर गृहमंत्री फडणवीस पुण्यात
पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात गृहमंत्र्यांची बैठक
अल्पवयीन गुन्हेगारावर कारवाई शक्य - फडणवीस 
कठोर शिक्षा मिळवण्यासाठी प्रयत्नशील - फडणवीस 
मद्यगृहांच्या आसपास गस्त वाढवणार - फडणवीस
पालकांनो आपल्या मुलांकडे लक्ष द्या - फडणवीस 
न्यायालयाच्या भूमिकेमुळे जनसंताप वाढला - फडणवीस
पुणे पोलिसांनी कठोर कारवाईचीच मागणी केली आहे - फडणवीस 
निवासी वस्तीतील मद्यगृहांवर पाळत ठेवणार - फडणवीस 
बेकायदेशीर मद्यगृहांना टाळे ठोका - फडणवीस
फडणवीसांनी पोलिसांवरील दबावाचा आरोप फेटाळला
पुणे पोलिसांनी हत्येचे कलम लावले आहे - फडणवीस


सम्बन्धित सामग्री