Tuesday, April 01, 2025 01:42:07 AM

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले

पौड परिसरात हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले.

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले

पुणे : पौड परिसरात हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले. जखमींपैकी तीन जणांची प्रकृती स्थिर आहे. हेलिकॉप्टरच्या चालकाला रुग्णालयात दाखल केले आहे.

पाऊस पडत असताना पुण्याच्या आकाशातून जात असलेले खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर पौड परिसरात कोसळले. हे हेलिकॉप्टर मुंबई येथून विजयवाडाच्या दिशेने जात होते. हेलिकॉप्टरने मुंबईतील जुहू येथून उड्डाण केले होते. पौड परिसरात हेलिकॉप्टर कोसळले तेव्हा मोठा आवाज झाला. आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना तातडीने बोलावले. स्थानिक आणि पोलिसांनी मदतकार्य केले.

        

सम्बन्धित सामग्री