Monday, September 16, 2024 08:36:31 PM

Kolkata
कोलकातामध्ये आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार

आंदोलकांनी मंगळवारी थेट पश्चिम बंगाल सरकारच्या सचिवालयाकडे कूच केले. आंदोलकांना थोपवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.

कोलकातामध्ये आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार

कोलकाता : कोलकाताच्या आर. जी. कर रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणात दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करत न्याय मिळवण्यासाठी आंदोलन सुरू झाले आहे. आंदोलकांनी मंगळवारी थेट पश्चिम बंगाल सरकारच्या सचिवालयाकडे कूच केले. आंदोलकांना थोपवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.

लाखो आंदोलक सचिवालयाच्या दिशेने येत असल्याचे बघून बंदोबस्तासाठी पोलिसांचा मोठा ताफा नियुक्त करण्यात आला. पोलिसांनी आदोलकांवर लाठीमार केला तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. पाण्याचा जोरदार मारा केला. अनेक आंदोलकांना अटक करण्यात आली. कठोर पोलीस कारवाई सुरू झाली तरी आंदोलकांनी माघार घेतलेली नाही. आंदोलकांनी पोलिसांनी उभारलेले अडथळे नष्ट करत पुढे सरकरण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. यामुळे पोलीस आणि आंदोलक यांच्यातील संघर्षाची तीव्रता वाढली आहे. आंदोलक सतत न्यायाची आणि मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

हावडा पूल बंद करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह पश्चिम बंगाल सरकारच्या अनेक मंत्र्यांच्या संरक्षणात वाढ करण्यात आली आहे. सर्व मंत्र्यांना जिथे आहेत तिथेच थांबा आंदोलनस्थळाच्या आसपास फिरकू नका, असे पलिसांकडून सांगण्यात आले आहे. 


सम्बन्धित सामग्री